बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व्यापारी बंधू जय भवानी चौक खडेबाजार बेळगावच्या तर्फे गणेश मंडप मुहूर्तमेढ पूजन 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंडळाचे अध्यक्ष रोहित रावळ व लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळचे अध्यक्ष विजय जाधव, बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव कार्याध्यक्ष सुनील जाधव, यांच्या शुभहस्ते मुहूर्तमेढ सोहळा पार पडला. यावेळी मंडळाचे खजिनदार संतोष उरणकर यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.
प्रारंभी सनई व ढोलताशांच्या गजरात खडेबाजार येथील अंबाई देवस्थान मंदिर, येथील देवस्थान मंडळकडून विधिपूर्वक पूजन करून आरती करण्यात आली तेथून पारंपरिक पद्धतीने भटजीकडून गणेश मंडप खांब मुहूर्तमेढ पूजन करण्यात येते.
हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा 2025 मध्ये बाप्पा ऑगस्ट मध्यात आपल्या घरी येतील. 27 ऑगस्टला बाप्पाचे आगामन होईल तर 9 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना 15 दिवस आदी आगमन होणार आहे.
गणेश उत्सवाची तयारी सुरु झाली असून व्यापारी बंधू खडेबाजार बेळगाव येथील मंडळांनी आपापल्या उपक्रमांना सुरुवात केली आहे. यावेळी अमोल उरणकर, निलेश खटावकर, मंडळाचे सरचिटणीस नजराज काकती यासह खडेबाजार परिसरातील मोठ्या संख्येने पंच, महिला, युवावर्ग उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta