बेळगाव : सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा नं. 19 या शाळेतील 1995-96 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन तब्बल 30 वर्षानंतर गेल्या रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडले.
टिळकवाडीतील न्यू उदय भवन येथे आयोजित हा स्नेहमेळावा तब्बल 50 हुन अधिक माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थितीने अविस्मरणीय ठरला.
प्रारंभी शाळा नं. 19 च्या निवृत्त मुख्याध्यापिका सुलोचना देऊसकर, शिक्षिका मंदाकिनी सुभेदार, माधवी पाटणकर, कुसुम राणे, ज्योती जीवन्नावर, सुनीता पाटील, मंदाकिनी देसाई व शकुंतला मोटार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थी ज्ञानदा वाघवडेकर, गजानन कदम, जोतिबा पावले, शितल गोरल, मंजुषा गुंडान्नाचे, प्रवीण शिंदे यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. स्वागत व प्रास्तावित माजी विद्यार्थिनी ज्ञानदा वाघवडेकर हिने केले.
यावेळी शिक्षकांनी केलेले कार्य, त्यांचे महत्त्व याबद्दल माजी विद्यार्थी गजानन कदम, प्रवीण शिंदे, आरती मोरे, ज्योतिबा पावले, विनायक नांगरे, यांनी विचार मांडून कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांतर्फे सर्व शिक्षकांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ, फळे, भेट वस्तू व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्व शिक्षकांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या शालेय आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एक प्रकारचे भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्नेहसंमेलन यशस्वीरित्या पार पडण्यासाठी माजी विद्यार्थी गौरीश गौंडाडकर आणि दिनेश देसूरकर यांचे मोठे योगदान लाभले. माजी विद्यार्थिनी ज्ञानदा वाघवडेकर हिचा आभार प्रदर्शनाने संमेलनाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta