
बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर स्वाध्याय विद्या मंदिर आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर अनगोळ, टिळकवाडी, शहापूर विभागाच्या प्राथमिक मुला -मुलींच्या अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने 118 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले तर बालिका आदर्श शाळेने 116 गुणासह उपविजेतेपद पटकाविले मुलांच्या गटातील अथलेटिक स्पर्धेत संत मीरा शाळेने 57 गुण तर मुलींच्या गटात बालिका आदर्श शाळेने 45 गुण घेत विजेतेपद मिळविले तर केएलएस शाळेच्या अनुज हणगोजीने व गुण बालिका आदर्श शाळेच्या समीक्षा करतसकर हिने 15 गुण घेत वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वाध्याय विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका एच आर कुलकर्णी, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर पी वंटगुडी, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा सिल्विया डिलीमा, सचिव प्रवीण पाटील, माजी अध्यक्ष बापू देसाई, चंद्रकांत पाटील स्पर्धा सचिव शिवशंकर सुंकद, उमेश बेळगुंदकर या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना व खेळाडूला चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी क्रीडा शिक्षक संतोष दळवी, रामलिंग परीट, अर्जुन भेकणे, उमेश मजुकर, कौशिक पाटील, जे बी पाटील, विठ्ठल पाटील, शिवकुमार सुतार, अनिल मुगळीकर, मथ्यु लोबो,.यश पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta