

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय, हंदिगनूर येथे 26 ऑगस्ट 2025 रोजी “समाजभूषण” लोकशाहीर बहिर्जी शिरोळकर यांचा 36 वा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला.
शाळा सुधारणा होते. कमिटीचे उपाध्यक्ष श्री. नारायण पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावर बहिर्जी शिरोळकर यांचे नातू श्री. दिनेश शिवाजीराव शिरोळकर, शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य श्री. कलाप्पा कडोलकर, श्री. गंगाधर पाटील, श्री. कलाप्पा पाटील, श्रीमती अनिता चौगुले, श्री. लक्ष्मण कुदनुरकर, मुख्याध्यापक श्री. जी. एस. पाटील व प्राचार्य एस. एस. मोहिते हे उपस्थित होते.
कै. बहिर्जी शिरोळकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू श्री. दिनेशराव शिवाजीराव शिरोळकर यांच्यावतीने मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. मान्यवरांनी समाजभूषण बहिर्जी शिरोळकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती आर. एस. पाटील यांनी बहिर्जी शिरोळकर यांच्या सामाजिक कार्याचा संपूर्ण आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस. व्ही. कांबळे यांनी केले.


Belgaum Varta Belgaum Varta