
बेळगाव : शहरातील कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट परिसरात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीच्या मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. सज्जाद सुभेदार असे मृत तरुणाचे आहे. तो शाहुनगर येथील रहिवासी असून बेंगळुरूमधील एका खाजगी कंपनीत काम होता.
काल रात्री आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या सज्जादचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाला, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या दुर्दैवी तरुणाचे पुढील महिन्यात लग्न होणार होते अशी देखील माहिती समजली.

Belgaum Varta Belgaum Varta