
बेळगाव : मुसळधार पावसामुळे गेल्या 19 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आता सुट्टी देण्यात आलेले शैक्षणिक दिवस भरून काढण्यासाठी उद्या शनिवार दि. 30 ऑगस्ट पासून दि. 20 सप्टेंबर 2025 पर्यंत दर शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत पूर्णवेळ शाळा भरविल्या जाणार आहेत. शालेय शिक्षण खात्याच्या बेळगाव उपसंचालकांनी उपरोक्त आदेश बजावला आहे. त्यामुळे उद्या शनिवारी 30 ऑगस्ट रोजी तसेच दि. 6, 13 व 20 सप्टेंबर 2025 अशा दर शनिवारी पूर्णवेळ शाळा भरणार आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta