बेळगाव : मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील हे पुन्हा एकदा मुंबई येथे उपोषणाला बसले आहेत या त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजानेही पाठिंबा जाहीर करत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी ठीक सकाळी 11 वा छ. श्री शिवाजी महाराज उद्यानपासून धर्मवीर छ. श्री संभाजी महाराज चौक पर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे सीमाभाग सहसंयोजक प्रकाश मरगाळे यांनी बैठकीत दिली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे हे होते. बैठकीच्या सुरुवातीला शिवराज पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी बोलताना रमाकांत कोंडुस्कर म्हणाले की, मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे जेणेकरून मराठा समाजाच्या मुलांना उच्च शिक्षण किंवा सरकारी नोकरीत प्राधान्य मिळालेच पाहिजेत असे सांगत मराठा समाजातील सर्व युवक-युवती, महिला, विविध संघटनांनी मूक मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.
यावेळी गुणवंत पाटील, संजय मोरे, नेताजी जाधव, रणजीत चव्हाण पाटील, दत्ता उघाडे, मोतेश बारदेशकर, अंकुश केसरकर, मालोजी अष्टेकर, विलास घाडी, अनिल अंबरोळे, अनिल पाटील, डी.बी. पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीला रावजी पाटील, विकास कलघटगी, एम. वाय. घाडी, उमेश पाटील, महेश जुवेकर, बाबू कोले, श्रीधर खन्नुकर, रावजी पाटील, संतोष कृष्णाचे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta