Wednesday , December 10 2025
Breaking News

मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या समर्थनार्थ बेळगावात मराठ्यांचा एल्गार!

Spread the love

बेळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजाने आज रविवारी बेळगावात सकल मराठा समाजातर्फे मूक मोर्चाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, शनी मंदिर, हेमू कलानी चौक, रामलिंग खिंड गल्ली मार्गे संभाजी चौक येथे मूक मोर्चाची सांगता करण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मराठा समाज सर्वच क्षेत्रात मागासला आहे. सरकारी नोकरी त्याचप्रमाणे उच्च शिक्षणात आरक्षण नसल्यामुळे विविध संधीपासून वंचित राहत आहे. तेव्हा सद्यस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील भाजप सरकारने तातडीचे विधानसभेचे अधिवेशन बोलवावे आणि मद्रास व पंजाब राज्याप्रमाणेच आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी सकल मराठा समाजाचे संयोजक प्रकाश मरगाळे यांनी केली.

रमाकांत कोंडुस्कर म्हणाले की, मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर मराठा समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात फायदा होईल जेणेकरून मराठा समाजातील युवकांना सरकारी नोकरी मिळेल व मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. मराठा समाज इतरांचे हक्क मागत नाही तर स्वतःचे हक्क मागत आहे, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बेळगाव येथील दलित समाजाने देखील मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करून मूक मोर्चात सहभागी झाला होता. मराठा समाजाने नेहमीच दलितांना पाठिंबा दिला आहे. आता दलित समाज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा देत आहेत. दलित नेते तलवार म्हणाले की, गरिबांचे राहणीमान सुधारण्यासाठी त्यांना आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे.

यावेळी ऍड. अमर यळ्ळूरकर यांनी आरक्षणाचे स्वरूप आणि महत्त्व याबद्दल माहिती सांगितली. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आम्ही पाठिंबा देतो. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रातील मुंबईत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समिती आणि संपूर्ण मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा आहे, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

आजच्या मूक मोर्चा मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बेळगावसह शहर, उपनगर, ग्रामीण त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातून देखील मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *