
बेळगाव : येळ्ळूर येथील वार्ड नंबर 4 मधील चांगळेश्वरी मंदिरच्या दक्षिण बाजूकडील भागाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण ग्राम पंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या योजनेतून पूर्ण करण्यात आले. गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी साचुन नागरिकांची व भाविकांची गैरसोय होत होती. ती गैरसोय वॉर्ड क्रमांक 4 चे ग्राम पंचायत सदस्य सतीश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व ग्राम पंचायत पीडीओ पूनम गडगे यांच्या सहकार्यातून पूर्ण करण्यात आले. हे कार्य ग्राम पंचायत सदस्य व त्या भागातील नागरिकांनी स्वतः उभे राहून करून घेतले. सदर रस्त्याचे काँक्रीटीकरण करून गैरसोय कायमस्वरूपी दूर केल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.









Belgaum Varta Belgaum Varta