
बेळगाव : आदर्श नगर येथील संजीवीनी फौंडेशनच्या इको-फ्रेंडली गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले.
प्रतिवर्षी पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी इको-फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना आणि विसर्जन केले जाते. या उपक्रमाचा उद्देश प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे हा आहे,
दररोज श्रींची पूजा आणि आरती प्रा. युवराज पाटील, उद्योजक शरद पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप चव्हाण, संजय पाटील, श्रीधर खन्नुकर, ॲड सागर खन्नुकर, कर सल्लागार संदीप खन्नुकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. सत्यनारायण पूजा अजित देगीनाळ आणि संध्या देगीनाळ यांच्या हस्ते पार पडली.
चौथ्या दिवशी गौरीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
पाचव्या दिवशी गणेश मूर्तीची वाजत गाजत नृत्य करीत मिरवणूक काढून फौंडेशनच्या परिसरात तयार केलेल्या विसर्जन कुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले./मूर्ती नैसर्गिकरित्या विघटित होणाऱ्या मातीपासून बनवली गेली होती ज्यामुळे जलप्रदूषण कमी होते. नैसर्गिकरित्या विघटित होणाऱ्या मूर्तींमुळे पर्यावरण स्वच्छ राहते. पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणारा हा एक महत्त्वाचा सामाजिक संदेश आहे.
जेणेकरून लोकही मातीच्या अथवा शेडूच्या मूर्ती बनवून पर्यावरणाची सुरक्षा राखण्यास प्रवृत्त होतील असे संस्थेचे चेअरमन मदन बामणे आणि संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta