Friday , March 6 2026
Breaking News

गोवावेस सिग्नलजवळ झालेल्या अपघातात कापोलीचा युवक ठार

Spread the love

 

बेळगाव : गोवावेस सिग्नलजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस्वार युवकाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. सुनील दिलीप देसाई (वय 42) राहणार कापोली खानापूर असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार आरपीडी कॉलेजकडून गोवावेसच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने सुनील देसाई यांच्या स्प्लेंडर दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सुनील देसाई यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *