बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हलकी-मुरगोड रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुरगोड गावच्या बाहेर एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना चिरडल्याने ही दुर्घटना घडली.
मृतांची ओळख पटली असून विशाल लमाणी (२०) आणि अप्पू लमाणी (२३) अशी त्यांची नावे आहेत. ते सौंदत्ती तालुक्यातील हुलिकेरी तांडा येथील रहिवासी आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना धक्का बसला आणि गावात शोकाकूळ वातावरण निर्माण झाले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta