बेळगाव : गणेश विसर्जनाची वेळी बेळगाव शहरात एका व्यक्तीचा जक्कीन होंडा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
बेळगाव शहरातील जक्कीन होंडा तलावात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे. घरात स्थापित गणेश मूर्तीचे तलावात विसर्जन सुरू असताना ही दुर्घटना घडली. स्थानिकांनी तलावात पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना ताबडतोब बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता.
मृताचे नाव राहुल ब्याकवाडकर (३३) असे आहे. तो बेळगाव शहरातील वड्डरवाडी येथील रहिवासी होता.
Belgaum Varta Belgaum Varta