बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर विज्ञान कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. इंद्रजीत मोरे यांनी केले. यावेळी साठे मराठी प्रबोधिनीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन लक्ष्मणराव ओऊळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले. या स्पर्धा घेण्यासाठी साठे प्रबोधिनीचा उद्देश काय आहे हे स्पष्ट करत, मुलांना आभासी जगातून वास्तवात आणण्यासाठी त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी अशा स्पर्धांची गरज आहे असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी ॲड. राजाभाऊ पाटील यांनी व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोपात श्री. सुभाष ओऊळकर यांनी लक्ष्मणराव ओऊळकर यांच्या कार्याचा व त्यांच्या विचारांचा आढावा घेतला. लक्ष्मणराव ओऊळकर हे मानवतावादी, निसर्गाविषयी संवेदनशील असणारे, प्राणीमात्रांवर दया करणारे होते. त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे चालवावा यासाठी त्यांच्या नावाने य या विज्ञान कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून प्रा. सुरेश पाटील, प्रा. परसु गावडे, बी. बी. शिंदे, विद्या देशपांडे, प्रा.मयूर नागेनहट्टी व बसवंत शहापूरकर यांनी काम पाहिले. स्पर्धेमध्ये प्राथमिक गटात 15 स्पर्धक व माध्यमिक गटात 58 स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे.. प्राथमिक विभाग
• प्रथम क्रमांक – सृजन पाटील (मराठी विद्यानिकेतन)
• द्वितीय क्रमांक – श्रेयस पाटील (न्यू इंग्लिश स्कूल मूतगे)
• तृतीय क्रमांक -आदिती परमोजी (मराठी विद्यानिकेतन)
• उत्तेजनार्थ –
1-सुखदा बिर्जे – बालिका आदर्श
2-श्रध्दा पाटील -सरकारी प्राथ. शाळा निलजी
3-आदिती शिंदे- मराठी विद्यानिकेतन
• माध्यमिक विभाग
• प्रथम क्रमांक – हर्ष गावडू पाटील (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
• द्वितीय क्रमांक – आयुष अरूण बाळेकुंद्री (सरस्वती हायस्कूल हंदिगनूर)
• तृतीय क्रमांक ( विभागून)-
लक्ष्मी श्रीधर पाटील- चांगळेश्वरी हाय. येळ्ळूर
मनाली सुभाष बराटे- मराठी विद्यानिकेतन
• उत्तेजनार्थ –
१) लक्ष्मी दत्तात्रय गुरव- कन्या विद्यालय चंदगड
२) संपूर्णा शशिकांत पाटील – वाघवडे हाय. वाघवडे यावेळी गौरी चौगुले, ज्ञानेश ओऊळकर, दिपक ओऊळकर, नारायण उडकेकर, सविता पवार उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नीला आपटे, प्रसाद सावंत, धिरजसिंह राजपूत, श्वेता सुर्वेकर, स्नेहा कुपेकर, अंजली, अरुण बाळेकुंद्री यांनी परिश्रम घेतले.
आभार प्रदर्शन श्री शिवराज चव्हाण यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल पोटे यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येईल.
Belgaum Varta Belgaum Varta