बेळगाव : सीमा लढ्यात अग्रस्थानी असलेले येळ्ळूर गाव. येळ्ळूर येथील “महाराष्ट्र राज्य” फलक हटविल्याच्या पार्श्वभूमीवर गावात अशांतता निर्माण झाली होती. या प्रकरणी मराठी भाषिकांवर दाखल केलेल्या खटल्या पैकी खटला क्रमांक 125 मधील 42 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्याकडे बेळगावसह संपूर्ण सीमाभागाचे लक्ष लागून राहिले होते.
2014 मध्ये महाराष्ट्र राज्य फलक हटविल्यानंतर पोलिसांनी येळ्ळूर गावातील नागरिकांना त्याचबरोबर निरपराध ग्रामस्थांवर सात विविध गुन्हे दाखल केले होते त्यापैकी तीन गुन्ह्यांचा यापूर्वी निकाल लागला असून या खटल्यात देखील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. खटला क्रमांक 125 च्या निकालात पोलिसांनी एकूण 42 जणांवर आरोप पत्र दाखल केले होते त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून सात जणांना या खटल्यातून वगळण्यात आले होते त्यामुळे आता 32 जणांविरोधात हा खटला सुरू होता सुनावणी दरम्यान सर्व 32 आरोपी न्यायालयात हजर होते. त्यावेळी त्यांच्या जबानी नोंदविण्यात आल्या होत्या. 2014 मध्ये महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा बोर्ड हटविल्यानंतर झालेल्या अमानुष मारहाणीनंतर येळ्ळूरवासीयांवर सात विविध दाखल करण्यात आले होते त्यापैकी चार गुन्ह्यात येळ्ळूर ग्रामस्थांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. उर्वरित तीन खटल्यात देखील येळ्ळूरवासीयांची यांची निर्दोष मुक्तता होईल, असा विश्वास ऍड. शामसुंदर पत्तार यांनी व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta