Thursday , March 5 2026
Breaking News

नेताजी मल्टीपर्पज सोसायटीची वार्षिक उलाढाल 66 कोटीवर

Spread the love

 

25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा : चेअरमन डी जी पाटील यांची माहिती
येळ्ळूर : शिवाजी रोड येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सोसायटीच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी जी पाटील होते. प्रारंभी सोसायटीच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नेताजी प्रतिमेचे पूजन चेअरमन डी जी पाटील यांनी केले. दीप प्रज्वलन व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे, नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे, के एन पाटील, संचालिका अस्मिता पाटील, चांगुणा मुरकुटे, भारता कणबरकर, यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संचालक प्रा. सी एम गोरल यांनी केले.

यावेळी बोलताना चेअरमन डी जी पाटील म्हणाले, संस्थेने सभासदांच्या विश्वासहार्ततेच्या बळावर गेल्या 24 वर्षात खूप चांगली प्रगती साधली असून, संस्थेच्या येळळूर व वडगाव येथे स्वतःच्या इमारती आहेत, संस्थेने आर्थिक व्यवहाराबरोबरच सामाजिक हिताचे ध्येय बाळगून परमेश्वर नगर येळ्ळूर येथे मराठी सांस्कृतिक भवनची निर्मिती केली आहे. संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे. व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे म्हणाले, संस्थेची वार्षिक उलाढाल 66 कोटी 41 लाखावर असून, संस्थेची गुंतवणूक 4 कोटी 50 लाख आहे, संस्थेकडे 30 कोटीच्या ठेवी आहेत, 19 कोटीची कर्जे वितरित केली आहेत, 33 लाख रुपयांचे भाग भांडवल आहे, या आर्थिक वर्षात 5 लाख 18 हजार इतका नफा संस्थेने मिळविला आहे. ताळेबंद पत्रकाचे वाचन सेक्रेटरी दीपक हट्टीकर यांनी केले, तर नफा तोटा पत्रकाचे वाचन चांगदेव मुरकुटे यांनी केले. यावेळी के एन पाटील यांनीही विचार मांडले, सभेला संचालक संजय मजुकर, रवींद्र गिंडे, प्रा सी एम गोरल, किरण गिंडे, सी एम उघाडे, कल्लाप्पा बंडाचे, मीनाजी नाईक, भोमाणी छत्र्यान्नावर, परशराम गिंडे, गणपती हट्टीकर, शंकर मुरकुटे, प्रभाकर कणबरकर, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे, जोतिबा गोरल, जोतिबा पाटील, रवी कणबरकर, कांचन पाटील, कल्याणी पाटील, ज्योती यरमाळकर, मुक्ता लोहार, सोनाली सायनेकर, संगीता दणकारे यांच्यासह सभासद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *