Friday , March 6 2026
Breaking News

जनगणना सर्वेक्षणात सर्व मराठ्यांनी धर्म “हिंदू”, जात “मराठा”, उपजात “कुणबी”, मातृभाषा “मराठी” अशी नोंद करावी : डॉ. सोनाली सरनोबत यांचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : नुकताच बेंगळूर येथे माजी मंत्री पी. जी. आर. सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. आगामी कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोग व शैक्षणिक सर्वेक्षण याच्या अनुषंगाने ही बैठक पार पडली. कर्नाटक क्षत्रिय राज्याध्यक्ष श्री. सुरेशराव साठे यांच्या नियोजनात सदर बैठक झाली. यावेळी जगद्गुरु श्री मंजुनाथ भारती स्वामीजी, माननीय मंत्री श्री. संतोष लाड, आ. श्री. श्रीनिवास माने, श्री. एम. जी. मुळे, के.के.एम.पी. गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन श्री. एस. आर. सिंधिया, राज्य सरचिटणीस श्री. सुनील चव्हाण, राज्य खजिनदार श्री. व्यंकटराव चव्हाण त्याचप्रमाणे समाजातील अनेक नेते व मान्यवर उपस्थित होते. सविस्तर चर्चेअंती आगामी राज्य शैक्षणिक व जात सर्वेक्षणात सर्व मराठ्यांनी धर्म “हिंदू”, जात “मराठा”, उपजात “कुणबी”, मातृभाषा “मराठी” अशी नोंद करावी व मराठा समाजाची एकजूट दाखवावी, असे आवाहन कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद महिला आघाडीच्या बेळगाव अध्यक्षा डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *