डिवाइन प्रॉव्हिडन्स महिला गटात विजेते
बेळगाव : नुकत्याच गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आबा स्पोर्ट क्लब व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या मराठा युवक संघाच्या विसाव्या आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा 78 गुण मिळवून सेंटपॉल्स स्कूलने “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन” हा किताब पटकाविला तर मुलींच्या गटामधील चॅम्पियनशिप 69 गुणासहित डिवाइन प्रॉव्हिडन्स स्कूलने पटकाविले तर 39 गुण मिळवून सेंट झेवियर्स व 43 गुण मिळून केएलई इंटरनॅशनल स्कूलने उपविजेतेपद मिळविले.
दोन दिवस चाललेल्या अत्यंत चुरशीच्या अशा स्पर्धेच्या अंतिम दिवशी बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे महापौर श्री. मंगेश पवार नगरसेवक, श्री. नितीन जाधव, प्रख्यात डॉक्टर नरेंद्र पाटील, उद्योजक महादेव चौगुले, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, चंद्रकांत गुंडकल, मारुती देवगेकर, आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलबते, नारायण किटवाडकर, शिवाजीराव हंगीरगेकर, सुहास किल्लेकर, विजय भोंगाळे, विश्वास पवार यांच्या हस्ते विजेत्या जलतरणपटूंना प्रशिक्षण पत्र व मेडल्स चॅम्पियन ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तिक विजेतेपक मिळवलेल्या जलतरणपटूंची नावे पुढीलप्रमाणे
कॉलेज गट तनुज सिंग जी एस एस कॉलेज. गट क्रमांक एक आदी शिरसाठ केंद्रीय विद्यालय 2, गट क्रमांक दोन अमोघ रामकृष्ण सेंट पोल्स् स्कूल. गट क्रमांक तीन मोहित काकतकर सेंट झेवियर्स, गट क्रमांक चार अद्वैत जोशी केएलए स्कूल गट क्रमांक पाच नमन पाटील सेंट पॉल्स
गट क्रमांक सहा रिश बिरजे कामधेनु स्कूल.
मुली कॉलेज गट सुनिधी हलकरे आरटीपी यु गट क्रमांक एक समृद्धी हलकरे ज्ञान प्रबोधन मंदिर, गट क्रमांक दोन रिया पवार केएलई इंटरनॅशनल, गट क्रमांक तीन निधी मुचंडी सेंट मेरीज, गट क्रमांक चार रिया पोरवाल केएलई इंटरनॅशनल, गट क्रमांक पाच दर्शिका निटूरकर सेंट मेरज गट क्रमांक सहा अद्विका पी. सेंट झेवियर्स या सर्व जलतरणपटूणी आपल्या गटातील वैयक्तिक विजेतेपदे मिळविली.
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा क्लबचे अध्यक्ष श्री. शितल हुलबत्ते, विश्वास पवार, अमित जाधव, संदीप मोहिते, रणजीत पाटील, शिवराज मोहिते, मारुती घाडी, वैभव खानोलकर, सुनील जाधव, हरीश मुचंडी, सतीश धनुचे, अभिषेक केस्टिकर, राहुल काकतकर, रामकृष्णसर, सौ. शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, विजया शिरसाठ, स्नेहल धामणकर, एकता सिंग, श्री रोटी, प्रसन्ना बसूतकर, स्वाती जाधव, हर्षाली पाटील, गौरी बेळगोजी, कलाप्पा पाटील, विशाल वेसने, चंद्रकांत बेळगोजी, भरत पाटील, विजय नाईक, विजय भोगन, किशोर पाटील, निखिल भेकने, प्रांजल सुलधाळ, ओम घाडी, यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta