
येळ्ळूर : कर्नाटक सरकारच्यावतीने 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत जातीनिहाय जनगणना करण्यात येणार आहे. यावेळी मराठा समाजाने ‘धर्म- हिंदू, जात मराठा, पोट जात- कुणबी, मातृभाषा- मराठी आणि व्यवसाय- शेती’, अशी नोंदणी करून शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळवून आपला विकास करून घ्यावा, यासाठी शिवसेना चौक विराट गल्लीतून सर्व मराठा समाजाची भव्य रॅली काढून जागृती करण्यात आली. यानिमित्ताने येळ्ळूर गाव ढवळून निघाला.
प्रारंभी छ. शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन माजी एपीएमसी सदस्य वामनराव पाटील व प्रगतशील शेतकरी यल्लापा टक्केकर यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे पूजन शिवाजी कदम व अण्णा हणमंत पाटील यांनी केले. येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर, सुवर्णा बिजगरकर, व प्राथमिक कृषि पतीन बॅंकेचे संस्थापक दौलत मोनापा कुगजी यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात झाली. रॅलीचे समालोचन प्रकाश अष्टेकर आणि दत्ता उघाडे यांनी केले.
सदर ‘जागृती रॅली’ विराट गल्लीमधून तानाजी गल्ली, मारुती गल्ली, चांगळेश्वरी गल्ली, नेताजी गल्ली, संभाजी गल्ली, सिद्धेश्वर गल्ली, जय महाराष्ट्र चौक, सुभाष गल्ली, ब्रम्हलिंग गल्ली, रामदेव गल्ली, परमेश्वर नगर, टिळक रोड, प्रताप गल्ली, पाटील गल्ली, कलमेश्वर गल्ली आणि शिवसेना चौकात समारोप झाला.
जागृती रॅलीचे शिस्तबद्ध नियोजन दुद्दापा बागेवाडी, राजू पावले, गणेश अष्टेकर, शुभम जाधव यांनी केले.
सदर जागृती रॅलीत चांगदेव परीट, उदय जाधव, विलास बेडरे, प्रकाश पाटील, सतीश देसुरकर, प्रदीप देसाई, भोला पाखरे, दयानंद उघाडे, राकेश परीट, सुरज गोरल, सुनील पाटील, आनंद घाडी, भोला पाखरे, रमेश धामनेकर, डाॅ. तानाजी पावले, अमोल जाधव, यलुप्पा पाटील, अनिल पाटील, युवराज घाडी, विलास नंदी, आनंद कुंडेकर, म्हात्रू लोहार अनिल पाटील, मधू पाटील, गोविंद पाटील, विलास पाटील, रमेश पाटील, भिमराव पुन्याणावर, अनिल पाटील, कृष्णा शहापूरकर, सौ. रविदास धामनेकर, बाळु धामनेकर, रामा पाखरे, दौलत पाटील, बाळु पाटील, संजय हुंदरे, अण्णा संभाजीचे, परशराम पावले, पिंटू पाटील, नंदकुमार पाटील, नागराज कुगजी, मोहन कुगजी, राहुल अष्टेकर, संकल्प जाधव, यश कुगजी आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta