
बेळगाव : महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निर्देशानुसार बेळगावातील हलगा गावासाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे.
गेल्या शुक्रवारी हलगा गावातील ग्रामस्थांनी मंत्री हेब्बाळकर यांच्या कार्यालयात जाऊन बससेवेची मागणी केली होती. मंत्र्यांनी त्वरित यावर लक्ष दिले आणि संबंधित अधिकाऱ्यांना बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, आजपासून हलगा गावात बस सुरू झाली. सकाळी लवकर गावात बस आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. यावेळी मंत्र्यांचे खासगी सचिव महांतेश हिरेमठ यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta