बेळगाव : बेळगाव शहरातील मराठा युवक संघातर्फे येत्या मंगळवार दि. 29 मार्च रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘बेळगाव श्री -2022’ या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे रीतसर निमंत्रण आज बुधवारी आयोजकांतर्फे पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांना देण्यात आले.
बेळगाव श्री -2022 शरीरसौष्ठव स्पर्धेसंदर्भात मराठा युवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी सकाळी अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तालयात जाऊन आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेतली.
सदर भेटीप्रसंगी पोलीस आयुक्तांना गेली 56 वर्षे आयोजित केल्या जाणाऱ्या सर्वात जुन्या बेळगाव श्री शरीरसौष्ठव स्पर्धेतबाबत माहिती देण्यात आली. तसेच स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहावे, अशी विनंती करून रीतसर निमंत्रण देण्यात आले. पोलीस आयुक्त डाॅ. बोरलिंगय्या यांनी निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.
पोलीस आयुक्त म्हणून करत असलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल यावेळी मराठा युवक संघातर्फे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी पोलीस आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सदर भेटीप्रसंगी मराठा युवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील संघटित गुन्हेगारी, गांजा आदी अंमली पदार्थांचे गैरधंदे आदिंबाबत पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्याशी चर्चा केली. यावेळी बोलताना पोलिस आयुक्तांनी मराठा युवक संघातर्फे गेल्या 56 वर्षापासून शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाद्वारे युवा पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याचे कार्य अतिशय प्रशंसनीय असल्याचे सांगितले.
आजकाल युवा पिढीमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे या पार्श्वभूमीवर मराठा युवक संघाचे हे कार्य काळाची गरज असल्याचे सांगून पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मराठा युवक संघाचे अध्यक्ष काकतकर यांच्यासह उपाध्यक्ष मारुती देवगेकर, विकास कलघटगी आणि विश्वक देवगेकर उपस्थित होते.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …