सभासदांना 12% लाभांश, चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांची माहिती
येळ्ळूर : दि. 22/9/2025 नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संचलित नवहिंद को-ऑप क्रेडिट सोसायटीची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवहिंद भवन येळ्ळूर येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर होते. प्रारंभी नवहिंदचे क्रीडा केंद्राचे सेक्रेटरी श्री. आनंद पाटील यांनी स्वागत गीत सादर केले. नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष एन. डी. गोरे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या मूर्तीचे पूजन केले. चेअरमन प्रकाश अष्टेकर, नारायण जाधव, सौ. माधुरी पाटील, सौ. नीता जाधव व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बँकिंग क्षेत्रात वावरताना मूलभूत तत्वे, नैतिकता, मूल्ये कशी जपावी, टिकवावी नातेसंबंध कसे जपावेत, आपलेसे करावेत हे सर्व नवहिंद पत संस्थेने दाखवून दिलेले आहे, असे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले. संस्थेला मागील वर्षात रु. 89 लाख नफा झाला असून 12 टक्के लाभांश देण्यात येत असल्याचे सांगितले. सन 2024-25 सालात संस्थेचे भाग भांडवल 02 कोटी 06 लाख, स्व निधी 16 कोटी 21 लाख, ठेवी 264 कोटी, कर्जे 224 कोटी, गुंतवणूक 46 कोटी इतके होते. यानंतर गतवर्षाच्या सभेच्या इतिवृताचे वाचन व्यवस्थापक श्री. जोतिबा शहापूरकर, ताळेबंद पत्रकाचे वाचन व्यवस्थापक श्री. मदन पाटील, नफा-तोटा पत्रकाचे वाचन व्यवस्थापक संदिप बामणे, नफा विभागणीचे वाचन व्यवस्थापक युवराज शिंदे यांनी केले. 2025-26 चे अंदाज पत्रक निलेश नाईक यांनी सादर केले.
नवहिंद पतसंस्थेच्या प्रगतीची घोडदौड अतिशय चांगली असून या संस्थेचे अनुकरण ईतर पतसंस्था करतात असे विचार माजी चेअरमन दत्ता उघाडे यांनी मांडले. सभा यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अधिकारी नारायण वेर्णेकर, वसुली प्रमुख जोतिबा नांदुरकर, व्यवस्थापक विवेक मोहिते यांनी परिश्रम घेतले. सभेस संस्थेचे संचालक सी. बी. पाटील, शिवाजी सायनेकर, उदय जाधव, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर, स्नेहलता चौगुले, भागधारक, नवहिंद परिवारातील सदस्य, संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन व्यवस्थापक विनोद पाटील यांनी केले. व्हा चेअरमन श्री. अनिल हुंदरे यांच्या आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta