बेळगाव : मलप्रभा धरणाच्या वरच्या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने, धरणाची पातळी २०७९.५० फूट आणि पूर्ण भरली आहे. मलप्रभा धरणात सध्या १५०० क्युसेकची आवक आहे. धरणाची पातळी योग्य राखण्यासाठी आज शनिवार दि. २७.०९.२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजेपासून मलप्रभा नदीला पाणी ३०० क्युसेकवरून १५०० क्युसेकपर्यंत वाढवून खबरदारीचा उपाय म्हणून हळूहळू सोडण्यात येत आहे.
मलप्रभा धरण काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta