Friday , March 6 2026
Breaking News

खानापूर उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांचे निधन

Spread the love

 

खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयातील प्रामाणिक आणि मनमिळाऊ अधिकारी उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार (वय ५०) यांचे मंगळवार, दि. ३० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

मूळचे बेळगाव तालुक्यातील कडोली येथील रहिवासी असलेले कल्लाप्पा कोलकार हे गेली आठ ते दहा वर्षे खानापूर तहसीलदार कार्यालयात उप तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ वृत्तीने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. उप तहसीलदार पदापर्यंत पोहोचूनही त्यांच्या अंगी कधीच गर्व नव्हता. त्यामुळेच तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक गोरगरीब व्यक्तीच्या कामाला ते नेहमी तत्परतेने मदत करत असत.
मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. अखेर, आज मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास मूळ गावी कडोली येथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर उद्या बुधवारी कडोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *