Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगांव ग्रामीण युवा काँग्रेसच्यावतीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल

Spread the love

 

बेळगाव : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपा प्रवक्ता पिंटू महादेव यांच्याविरुद्ध बेळगाव पोलीस आयुक्तांकडे बेळगांव ग्रामीण युवा काँग्रेस यांच्यावतीने युवा नेता मृणाल दादा हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली तक्रार दाखल करण्यात आली.

बेळगाव पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी तक्रार स्वीकारली. यावेळी उचगांव ब्लॉक युवा काँग्रेस अध्यक्ष व्यंकट पाटील, उपाध्यक्ष निंगप्पा तल्लुरी, सुनील नाईक, नारायण काळसेकर, महेश नाईक, गोपाळ पाटील, मोहन पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *