Sunday , December 14 2025
Breaking News

म. ए. युवा समिती आयोजित वक्तृत्व स्पर्धा यशस्वी

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताहाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा लोकमान्य रंगमंदिर येथे संपन्न झाली. ही स्पर्धा तीन विभागात संपन्न झाली.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन समिती नेते रमेश पावले यांच्या हस्ते झाले. नेताजी जाधव, वाय. पी. नाईक, प्रा. मयुर नागेनहट्टी, प्रा. परसु गावडे, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सुरज कुडूचकर, किरण हुद्दार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
सदर स्पर्धेला वाय. पी. नाईक, प्रा. मयुर नागेनहट्टी, प्रा. परसु गावडे, प्रा.अरविंद पाटील, वृषाली कदम-दड्डीकर, सोनाली कांगले परीक्षण केले.

स्पर्धेचे विजयी स्पर्धक

प्राथमिक गट विजेते
प्रथम क्रमांक – क्रांती मारुती पाटील
द्वितीय क्रमांक – पुर्वी रमेश घाडी
तृतीय क्रमांक – अथर्व विठ्ठल गुरव
उत्तेजनार्थ – अदिती दिनकर परमोजी

माध्यमिक गट विजेते
प्रथम क्रमांक – साईराज राम गुरव
द्वितीय क्रमांक – वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर
तृतीय क्रमांक – हर्ष गावडू पाटील
उत्तेजनार्थ – हर्षदा म्हात्रु भातकांडे

महाविद्यालायीन गट विजेते
प्रथम क्रमांक – संकेत पाटील
द्वितीय क्रमांक – सायली तुपारे
तृतीय क्रमांक – आर्या गायकवाड
उत्तेजनार्थ – अनुजा लोहार

स्पर्धेला आणि बक्षीस वितरणाला समिती नेते रणजीत चव्हाण पाटील, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, मदन बामणे, संतोष कृष्णाचे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, शिवानी पाटील, डॉ. सुरेखा पोटे, सविता देगीनाळ, सागर पाटील, शिवराज पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, प्रशांत भातकांडे, बाळू जोशी, शेखर तळवार, उमेश पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतीक पाटील, विनायक कावळे, आशिष कोचेरी, अजय सुतार, आकाश भेकणे, रोहन कुंडेकर, साईराज जाधव, निखिल देसाई, रोहित गोमाणाचे, सुरज चव्हाण, जोतिबा पाटील, विकास भेकणे, महंतेश अलगोंडी, प्रवीण धामणेकर, अक्षय बांबरकर, सौरभ तोंडले, आनंद पाटील, महेश चौगुले, श्रीकांत कदम आदींनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

आरोपी मुख्याध्यापकास कठोर शिक्षा द्या; कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सेक्रेटरी डॉ. सोनाली सरनोबत

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकावर अनेक विद्यार्थिनींसोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *