

बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जीजीसी सभागृह, बुधवार पेठ टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
कनिष्ठ विभागात सहावी ते आठवी व वरिष्ठ विभागात नववी ते बारावीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. एका संघात दोन विद्यार्थी असतील. स्पर्धेत परिषदेतर्फे प्रकाशित ‘भारत को जानो’ या पुस्तकातील प्रश्न विचारले जातील. ज्यामध्ये भारताच्या संपूर्ण इतिहासाची इत्थंभूत माहिती आहे. स्पर्धा 4 फेऱ्यांमध्ये होईल. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येतील. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी प्रांतस्तरीय स्पर्धेस पात्र ठरतील. प्रांतस्तरीय विजेते दक्षिण भारत विभागीय तसेच तेथील विजेते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
अधिक माहितीसाठी स्पर्धाप्रमुख डॉ. जे. जी. नाईक अथवा प्रा. अरुणा नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे अध्यक्ष विनायक मोरे यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta