Friday , April 17 2026
Breaking News

श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग, तोपिनकट्टीत खो-खो, कबड्डी स्पर्धा 18 व‌ 19 ऑक्टोबर रोजी

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे खास दिवाळीच्या सणानिमित्त श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग यांच्यावतीने दिनांक 18 व दिनांक 19 ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खो -खो स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहेत.
विजयी संघांना पहिले बक्षीस रुपये 21001 व ट्रॉफी, दुसरे बक्षीस रुपये 11001 व ट्रॉफी, तिसरे बक्षीस रुपये 4001, चौथे बक्षीस रुपये 2101, अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.
कबड्डी स्पर्धा सायंकाळी साडेचार वाजता होणार आहेत. विजयी संघांना विजयी संघांना पहिले बक्षीस रुपये 21001 व ट्रॉफी, दुसरे बक्षीस रुपये 11001 व ट्रॉफी, तिसरे बक्षीस रुपये 4001, चौथे बक्षीस रुपये 2101, अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.
प्रवेश फी रुपये 1501 आहे. तरी संघानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
तसेच ह्या वर्षी तोपिनकट्टी गावातील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन व सत्कार करण्यात येणार आहेत.
बेळगाव जिल्हा एक गाव एक, संघ व खानापूर तालुक्यातील संघ, एका बाजूने व बेळगाव जिल्हा ईतर संघ एका बाजूने असे खेळवले जातील. व खो-खो अणि कबड्डी दोन्ही संघांना 19 तारीख राखीव ठेवण्यात आली आहे

नाव नोंदणी संपर्कसाठी मोबाईल नंबर 9980983121, 9108897847

About Belgaum Varta

Check Also

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

Spread the love  खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *