Wednesday , March 4 2026
Breaking News

डीसीसी बँक संचालक मंडळाच्या ६ जागांवर जारकीहोळी समर्थकांची बिनविरोध निवड

Spread the love

 

बेळगाव : राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व दिसून आले आहे. 16 पैकी सहा जागांवर जारकीळी समर्थकांची बिनविरोध निवड झाल्याने केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सहकार क्षेत्रात देखील जारकीहोळी कुटुंब यांचे वर्चस्व सिद्ध होत आहे. बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये चिकोडीतून गणेश हुक्केरी, यरगट्टी येथून आमदार विश्वास वैद्य, मुडलगीतून निळकंठ कपलगुद्धी, सौन्दत्ती येथून वीरूपाक्ष मामनी, गोकाक मधून रमेश जारकीहोळी यांचा मुलगा अमरनाथ तर बेळगाव मधून सतीश जारकीहोळी यांचा मुलगा राहुल जारकीहोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. 13 ऑक्टोंबर रोजी निवडणूक अधिकारी या निवडीबद्दल अधिकृत घोषणा करणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक केवळ आर्थिक संस्था नसून स्थानिक नेत्यांचे राजकीय वर्चस्व अधोरेखित करते त्यामुळे निवडणुकीपूर्वीच सहा जागांवर बिनविरोध निवड होणे म्हणजे जारकीहोळी बंधूंच्या राजकीय विजयाची नांदीच म्हणावी लागेल. 12ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 13 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहेत. उर्वरित दहा जागांसाठी अंतिम लढत होणार असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *