Thursday , March 5 2026
Breaking News

बाग परिवाराचा काव्यवाचनाचा कार्यक्रम संपन्न!

Spread the love

 

बेळगाव : बाग परिवाराचा ऑक्टोबर महिन्यातील काव्यवाचनाचा कार्यक्रम आज जत्तीमठ येथे पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा सडेकर यांनी केले. काव्यवाचन कार्यक्रमात एकापेक्षा एक दर्जेदार अशा कविता सादर झाल्या. जेष्ठ कवी निळू भाऊ नार्वेकर (फक्त एक रात्र), स्नेहल बर्डे (कोरोना), अशोक सुतार (भावना अंधश्रद्धेच्या), जोतिबा नागवडेकर (इंग्रजी), प्रतिभा सडेकर (मुलगी जन्मली), चंद्रशेखर गायकवाड (येईन मी), आनंद मेणशी (ही प्रीत अजब), स्मिता पाटील (पणती), अपर्णा पाटील (कॉलेज के दिन), गुरुनाथ किरमटे (बाप), रोशनी हुंद्रे (काहूर) अशा वेगवेगळ्या विषयांच्या कवितांचे सादरीकरण झाले. यावेळी कवितांच्या अनेक विषयावर चर्चा झाल्या आणि नवीन उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल बर्डे यांनी केले. आभार अपर्णा पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *