Wednesday , March 4 2026
Breaking News

अपार्टमेंटमधील कार बाहेर काढताना धडक बसून सिक्युरिटी गार्डचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : न्यू गुड्सशेड रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये पार्क केलेली कार बाहेर काढताना कारच्या धडकेत सेक्युरिटी गार्डचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे.

मृत सिक्युरिटी गार्डाचे नाव नागेश शटुप्पा देवजी (वय 56, रा. माळी गल्ली, बेळगाव) असे आहे. रविवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता अपार्टमेंटच्या पार्किंगमधून कार बाहेर काढताना नागेश यांना तीव्र धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. तत्काळ त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
नागेश देवजी यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *