Sunday , July 26 2026
Breaking News

राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अनगोळच्या वैभवी बुद्रुक हिची चमक

Spread the love

 

 

बेळगाव : कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर ओडिसा येथे आयोजित 40 व्या राष्ट्रीय कनिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अनगोळ, बेळगांव येथील कु. वैभवी बाळू बुद्रुक हिने रिले शर्यतीमध्ये कर्नाटक राज्याला रौप्य पदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

40 व्या राष्ट्रीय कनिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अनगोळ, बेळगांवच्या कु. वैभवी बाळू बुद्रुक हिने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करत 4 X 100 मीटर्स रिलेमध्ये 47:75 इतका वेळ देत द्वितीय क्रमांकासह कर्नाटक राज्याला रौप्य पदक मिळवून दिले. कर्नाटकच्या संघात वैभवी बुद्रुक, स्तुती शेट्टी, लेखना एस. आणि वर्षीथा या धावपटूंचा सहभाग होता. वैभवी ही लिंगराज कॉलेजची विद्यार्थिनी असून तिला ॲथलेटिक्स प्रशिक्षक अशोक शिंत्रे व मधुकर देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अनगोळ येथील प्रतिष्ठित नागरिक बाळू बुद्रुक यांची कन्या असलेल्या वैभवीला आई-वडिलांसह लिंगराज कॉलेजचे प्राचार्य व क्रीडा शिक्षक श्री रामराव यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *