Friday , June 5 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर माजी आमदार अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड!

Spread the love

 

बेळगाव : मागील 20 वर्षांपासून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निर्विवाद वर्चस्व असलेले माजी आमदार अरविंद पाटील यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार व विद्यमान संचालक अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचा विजायोत्सव साजरा करण्यासाठी आज खानापूर शहरात विजय मिरवणूक काढण्यात येणार आहे. गर्लगुंजी पिकेपीएसचे चेअरमन राजू सिद्धाणी यांनी रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या नामनिर्देशन प्रक्रियेत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे अरविंद पाटील यांच्या विरोधात एकही उमेदवार शिल्लक न राहिल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे अरविंद पाटील यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आज सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी खानापूर शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य विजय मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी खानापूर बस स्थानकापासून या मिरवणुकीला सुरुवात होणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघणार आहे.

यावेळी अरविंद पाटील यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येणार असून खानापूर तालुका तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक संस्था, ग्रामपंचायत सदस्य, महिला मंडळी, युवक मंडळे देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अरविंद पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे खानापूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या या विजयामुळे त्यांच्या पुढील राजकीय कारकीर्दीची समीकरणे बदलणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्यास विरोध; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार

Spread the love  बेळगाव : सावगाव येथील सरकारी हायर प्रायमरी मराठी मुला-मुलींच्या शाळेच्या परिसरात कन्नड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *