

बेळगाव : माजी नगरसेवक नेताजी नारायण जाधव यांनी सामाजिक सहकार्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.
१६ ऑक्टोबर रोजी बेळगाव येथील मराठा मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, मराठा को-ऑप बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि ‘द बेळगांव बेकर्स को-ऑप. सोसायटी’चे माजी चेअरमन शिवाजीराव हंगीरगेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

Belgaum Varta Belgaum Varta