

बेळगाव : दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, आंध्र व तेलंगाणा विभागाच्या हैद्राबाद, खैरताबाद येथे स्थित पापन्न गुप्ता हॉलमध्ये डॉ. दत्तात्रय देसाई यांच्या ‘दहलीज… एक सीमा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन अत्यंत गौरवशाली वातावरणात पार पडले.
दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, आंध्र व तेलंगाणा विभागाचे अध्यक्ष श्री पी. ओबय्या यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला। विशेष अतिथी म्हणून दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, चेन्नईचे परीक्षा सचिव श्री एम. जी. गुत्तल, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, आंध्र व तेलंगाणाचे द्वितीय उपाध्यक्ष श्री एल. मधुसूदन, कोषाध्यक्ष श्री शेख मुहम्मद खासिम, प्रबंध निधिपालक श्री चवाकुल रामकृष्णराव, प्रभारी सचिव श्री राधाकृष्ण मिरियाला, वित्त प्रबंधक श्री डी. किशोर बाबू, बी.एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. के. चारुलता, तसेच पी.जी. विभागाच्या विभागाध्यक्षा डॉ. साहेरा बानो बोरगल मंचावर उपस्थित होते.
पुस्तकाचे प्रकाशन अध्यक्ष श्री. पी. ओबय्या आणि विशेष अतिथी श्री एम. जी. गुत्तल यांच्या हस्ते करण्यात आले.
कवीवर डॉ. दत्तात्रय देसाई हे बेळगाव येथील हुक्केरी तालुक्यातील बेलंकी गावचे आसुन ते सध्या हैदराबाद येथील दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या अध्यापक महाविद्यालयामध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. मान्यवरंच्या हस्ते शाल व पुष्प देवून डॉ. दत्तात्रय यांचा सत्कार करण्यात अला.कवी ने आपले विचार व्यक्त करताना सांगितले की “दहलीज… एक सीमा” हे मानवाच्या संवेदना, अनुभव आणि सामाजिक वास्तवाचे सत्यप्रतिबिंब आहे। आपल्या कवितांमधून त्यांनी मानवी मन आणि समाज यांच्या सीमांचे सुंदर दर्शन घडविले आहे। कवींनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी सचिव श्री राधाकृष्ण मिरियाला आणि प्राचार्या डॉ. के. चारुलता यांचे आभार मानले.
या सोहळ्यात “दहलीज… एक सीमा” या पुस्तकाचा प्रस्तावना परिचय डॉ. वै. ललिता यांनी करून दिला , तसेच श्रीमती पी. अरुणा देवी यांनी पुस्तकातील एक कविता सादर केली.
या पुस्तकाच्या प्राक्कथनासाठी डॉ. सी. एन. मुगुटकर (प्राचार्य, शिक्षण महाविद्यालय, बेलगाव), डॉ. वै. ललिता आणि समीक्षक श्री राम अभिषेक मिश्र यांचे कवींनी विशेष आभार मानले.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक, साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी कवीला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समरम्भचा शेवट हिंदी भाषा आणि काव्य साहित्या वरील दृढ संकल्पा सह करण्यात आला.

Belgaum Varta Belgaum Varta