

बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली. निवृत्त नौसेना लेफ्टनंट शिवानंद शानभाग (विशेष सेवा मेडल) व विनोद देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात अक्षता मोरे यांच्या संपूर्ण वंदे मातरम् गायनाने झाली. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. डॉ. जे. जी. नाईक यांनी “भारत को जानो” स्पर्धेविषयी विस्तृत विवेचन केले. विनोद देशपांडे यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उत्कृष्ट संचलन केले. विनायक घोडेकर आणि सुभाष मिराशी यांनी स्कोअरर म्हणून चोख कामगिरी बजावली.
स्पर्धेत कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक – संत मीरा स्कूल, गणेशपूर, द्वितीय क्रमांक – संत मीरा स्कूल, अनगोळ, तृतीय क्रमांक जी. जी. चिटणीस स्कूल, विशेष पारितोषिके के. एल. एस. स्कूल आणि मुक्तांगण विद्यालय यांनी पटकावली. वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक – भरतेश इंग्रजी माध्यम स्कूल, द्वितीय क्रमांक – संत मीरा हायस्कूल अनगोळ, तृतीय क्रमांक – ज्योती सेंट्रल स्कूल, विशेष पारितोषिके जी. जी. चिटणीस स्कूल व बालिका आदर्श विद्यालय यांनी प्राप्त केली. दोन्ही गटातील प्रथम क्रमांक प्राप्त संघांची 26 ऑक्टोबर रोजी रायचूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. अरुणा नाईक यांनी केले. स्कोअरर म्हणून विनायक घोडेकर आणि सुभाष मिराशी यांनी काम पाहिले. पवित्रा हलप्पनवर यांनी तांत्रिक बाजू योग्यपणे सांभाळली. सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास डॉ. जे. जी. नाईक, प्राचार्य व्ही. एन्. जोशी, विनायक घोडेकर, डी. वाय. पाटील, पांडुरंग नायक, सुहास गुर्जर, सुभाष मिराशी, रामचंद्र तिगडी, पी. एम. पाटील, पी. जे. घाडी, ॲड. बना कौजलगी, रजनी गुर्जर, प्रिया पाटील, शुभांगी मिराशी, विद्या इटी, ज्योती प्रभू, शालिनी नायक, भारत विकास परिषदेचे सदस्य, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta