

१७ नोव्हेंबर बाळासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर; तसेच गेल्या वर्षीच्या किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा लवकरच
बेळगाव : बेळगाव सीमाभागात युवासेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बेळगाव युवासैनिकांची एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. विनायक हुलजी, सोमनाथ सावंत, मल्हार पावशे, अद्वैत चव्हाण पाटील, विद्येश बडसकर, ओमकार बैलूरकर, महेश मजुकर, अमेश देसाई, सक्षम कंग्राळकर, प्रणय पाटील, वैभव मारगणाचे व इतर युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले होते. आगामी काळात सीमाभागात युवासेनेची ताकद अधिक प्रभावीपणे वापरण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
या बैठकीत युवासेनेच्या भविष्यातील कार्याची दिशा आणि कार्यक्रमांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. आगामी काळात सीमाभागात मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी युवाशक्तीचा प्रभावीपणे वापर करण्यावर भर देण्यात आला. यासोबतच, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे निमित्ताने रक्तदान शिबिर तसेच, मागील वर्षी युवासेना बेळगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यासाठी समारंभ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीमुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पुढील वाटचालीस ही बैठक प्रेरणादायी ठरेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. भविष्यातही सीमाभागात मराठी अस्मितेच्या संरक्षणासाठी युवासेना कार्यरत राहील असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta