Tuesday , March 3 2026
Breaking News

मतिमंद मुलांचे जीवन आदर्शवत : मंजुनाथ गड्डेण्णावर

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : मतिमंद मुलांच्या जिवनात आनंदाची बहार येऊ दे, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, असे दैनिक मनध्वनीचे संपादक मंजुनाथ गड्डेण्णावर यांनी सांगितले. त्यांनी आपला वाढदिवस निपाणी येथील नितिशकुमार कदम यांच्या मतिमंद मुलांच्या वस्तीशाळेत उत्साही वातावरणात साजरा केला. यावेळी मंजुनाथ गड्डेण्णावर यांनी मतिमंद मुलांना केक बिस्कीट वाटप करुन त्यांना स्नेहभोजन दिले. ते पुढे म्हणाले मतिमंद मुलांचे जीवन आदर्शवत आहे.
त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूपकांहि असल्याचे सांगितले. मंजुनाथ यांचे विचार शिक्षिकेने मुलांना हावभाव करीत समाजातून सांगितले. यावेळी अमोल गोंधळी, इम्रान नालबंद, राहुल सुर्यवंशी, रोहन काळे, पवन काळे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *