बेळगाव : बी. ई. संस्थेच्या बी. के. मॉडेल हायस्कूलचा शतकमहोत्सव कार्यक्रम दि. 20 पासून ते 23 डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात पूर्वतयारी चर्चा करण्यासाठी राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी शाळेमध्ये उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेच्या वतीने अध्यक्ष अविनाश पोतदार आणि कार्यदर्शी श्रीनिवास शिवनगी यांच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शतक महोत्सव संदर्भात त्यांनी अनेक विषयावर चर्चा केली आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खासदार फंडातून दहा लाख रुपये व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta