Monday , September 21 2026
Breaking News

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने मराठी व्याकरण व हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने रविवार दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व द. रा. किल्लेकर स्मृती सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ठीक 9.30 वाजता मराठी विद्यानिकेतन येथे सुरू होतील. या संदर्भातल्या नियोजनाची बैठक आज मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. या स्पर्धा दोन गटात होणार असून इयत्ता दहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा असेल. तसेच प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांमध्ये हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. तरी सीमा भागातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन यश संपादन करावे असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे. त्याचबरोबर बैठकीमध्ये 14 व 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रौप्यमहोत्सवी बालसाहित्य संमेलनाच्या नियोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. नियोजनाच्या आढावा बैठकीमध्ये प्रबोधिनीचे सदस्य प्रा. सुरेश पाटील, सुरेश गडकरी, इंद्रजीत मोरे, बसवंत शहापूरकर, बी.बी. शिंदे, एन.सी. उडकेकर, प्रसाद सावंत, धीरज सिंह राजपूत, नीला आपटे, सविता पवार, हर्षदा सुंठणकर, स्नेहल पोटे, गौरी चौगुले उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *