
बेळगाव : आज बेळगावमध्ये कर्नाटक राज्योत्सव जिल्हा स्तरावर साजरा होत असताना पथसंचलन सुरू होते. याच दरम्यान पालकमंत्री सतीश जारकीहोळी ज्या वाहनातून संचलन पाहण्यासाठी जात होते, त्या जीपमधून डिझेल गळती सुरू झाली. तातडीने तेथे उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी फायर कंट्रोल गॅसची फवारणी करून पुढील मोठा अनर्थ टाळला.
बेळगावमध्ये सुरू असलेल्या कन्नड राज्योत्सवाच्या निमित्ताने, जिल्हा क्रीडांगणावर पालकमंत्री सतीश जारकीहोळी पथसंचलन निरीक्षणासाठी जात असताना त्यांच्या जीपमधून डिझेलची गळती झाल्याने मोठी दुर्घटना टळली. ध्वजारोहणानंतर मंत्री सतीश जारकीहोळी वाहनामध्ये बसण्यापूर्वीच डिझेलची गळती सुरू झाली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित आग लागू नये म्हणून फायर कंट्रोल गॅसची फवारणी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सदर वाहन मैदानाबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.
Belgaum Varta Belgaum Varta