Tuesday , March 3 2026
Breaking News

रोशनी बामणे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

बेळगाव : चिक्कबळ्ळापूर येथील एम. व्ही. जिल्हा अंतर्गत क्रीडांगण स्टेडियममध्ये सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे 17 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगाव जिल्हा कराटे संघटनेच्या मन्नूर व गोजगे शाखेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या रोशनी बामणे हिचा प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मान करण्यात आला असून तिला राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कराटे प्रशिक्षक विनायक दंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोशनी बामणे -32 किलो गटात साडेतीन वर्षांपासून सातत्याने प्रशिक्षण घेत आहे.

बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर तसेच खजिनदार दीपक काकतीकर यांचेही मार्गदर्शन तिला लाभले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *