
बेळगाव : सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी सरकारी चिंतामणराव पदवी पूर्व कॉलेज शहापूर डीडी 0024 बेळगावच्या एन. एस. एस. वार्षिक विशेष शिबिराची सांगता झाली. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून चिंतामणी कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती विजया नाईक, समाज शास्त्राचे प्राध्यापक एस. एस. हिरेमठ सर, कॉलेजच्या लायब्ररीएन सविता गुड्डीन मॅडम, कॉलेजच्या एफ. डीए. श्रीमती सविता पाटील, एन. एस. एस. चे कार्यक्रमाधिकारी श्री. परशराम कुंभार सर, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.टी. बी. बेटेगिरी, पिरनवाडी ग्रामपंचायत कम्युनिटी मोबिलायझर श्रीमती श्रुती लोहार व रेखा भोई वडर तसेच गावातील प्रतिष्ठित गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. परशराम कुंभार सरांनी पाहुण्यांचे परिचय बरोबरच सात दिवसातील शिबिरातील आपला अनुभव सांगितला. यानंतर श्री. टी. बी. बेटगिरी सरांनी शिबिरार्थींना उद्देशून या शिबिरातील सात दिवसात घेतलेल्या अनुभवाचा जीवणामध्ये उपयोग करून घेऊन जीवन कसे सुंदर करता येईल याबद्दल विचार मांडले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या श्रीमती विजया नाईक मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्यात पहिल्या दिवसापासून आजपर्यंत झालेल्या बदलाचा उल्लेख केला व संपूर्ण जीवनात या सात दिवसाच्या एनएसएस शिबिराचा हा परिणाम कायम ठेवावा असा विचार मांडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी कुमारी वैष्णवी गोडसेने केला. सन्मान कार्यक्रम चिंतामणी कॉलेजच्या लायब्ररीयन सविता गुड्डीन यांनी केला. आभार प्रदर्शन शिबिरार्थी कुमारी प्रियांका करबसपणावर हिने केला.
Belgaum Varta Belgaum Varta