
बेळगाव : यंदाचा राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार पुणे येथील सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड किशोर ढमाले व प्रा. प्रतिमा परदेशी यांना संयुक्तपणे देण्यात येणार आहे. पुरस्कार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते.
गुरुवार दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता खानापूर येथील आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृह शिवस्मारकमध्ये पुरस्कार वितरण होणार आहे. समितीचे अध्यक्ष इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे यंदाचे आठवे वर्ष आहे. आजवर हा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव (पुणे), माणिकराव उर्फ भाऊसाहेब पोटे (अकोला), पुरोगामी लेखक डॉ. आ. ह. साळुंखे (सातारा), शे. का. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भाई एन. डी. पाटील (कोल्हापूर), समाजवादी नेते पन्नालाल सुराणा (उस्मानाबाद), कष्टकरी जनतेचे नेते व लेखक डॉ. भारत पाटणकर (सांगली) आणि बेळगांवचे ज्येष्ठ नेते, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta