
बेळगाव : दर्जेदार वस्तू न दिल्यास, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा केल्यास, जिल्हा न्यायालय, राज्य न्यायालय याठिकाणी प्रश उपस्थित करण्यासाठी मंच निर्मिती करण्यात आली असून ग्राहकांनी याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी केले.
बेळगावमध्ये कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्याहस्ते पार पडले. उद्घाटनानंतर ग्राहकांच्या हक्कांसंदर्भात माहित देताना जिल्हाधिकारी म्हणाले, जॉन एफ केनेडी नावाचा ग्राहकांसाठी एक कायदा आहे. यासंदर्भात भारतात 1986 मध्ये अधिसूचना जारी करण्यात आली असून प्रत्येक टप्प्यात ग्राहकांच्या हक्कांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ग्राहकांना अनेक प्रश्न विचारण्याचा हक्क या कायद्यांतर्गत देण्यात आला आहे. यासह ग्राहक दिनासंदर्भात अनेकविध माहितीही जिल्हाधिकार्यांनी दिली.
वकील एन. आर. लातूर बोलताना म्हणाले, नोंदणीकृत व्यक्तीच केवळ न्यायालयात धाव घेऊ शकते असे नाही. केपी ऍक्ट अंतर्गत ग्राहक भरपाई मिळवू शकतात. त्याचप्रमाणे दिवाणी न्यायालयातदेखील भरपाई मागितली जाऊ शकते. ज्या ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे अशा व्यक्तीला दिवाणी न्यायालयात शिक्षा सुनावली जाऊ शकते. तसेच भादंवि कलम 31,32 अंतर्गत ग्राहक रक्षण कायद्यानुसार फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. तसेच ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी मालमत्ता देखील जप्त होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमास अन्न विभागाचे सहसंचालक चन्नबसप्पा कोडली, सहाय्यक संचालक जे. सी. अष्टगीमठ, एलपीजी आयओसी एम. एस. जोशी, अतिरिक्त जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाचे अध्यक्ष संजीव कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष राचप्पा ताळीकोटी, सदस्या सुनंदा काद्रोळीमठद, बी. यु. गीता आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta