
बंगळुरू : कर्नाटक सॉफ्ट बॉल प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेतील सुपर १६ च्या रोमांचक सामन्यात राजा शिवाजी बेळगाव संघाने चिक्कमंगळुरू संघाचा ४० धावांनी पराभव करून सुपर ८ मध्ये प्रवेश केला.
आज झालेल्या सामन्यात चिक्कमंगळूरूने संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चिक्कमंगळूरू संघावर उलटला. प्रथम फलंदाजी करताना राजा शिवाजी बेळगाव संघाने ९ षटकांत ४ बाद ११३ धावा केल्या आणि ११४ धावांचे स्पर्धात्मक लक्ष्य ठेवले.
पण राजा शिवाजी बेळगाव संघाच्या धारदार गोलंदाजीवर चिक्कमंगळूरू संघाला ९ षटकांत ९ बाद ७४ धावाच करता आल्या आणि राजा शिवाजी बेळगावला ४० धावांचा दणदणीत विजय मिळाला.
🏅 सामनावीर: राहुल कुडची
— २ षटके, १४ धावा, ४ विकेट्स.
या विजयासह, राजा शिवाजी बेळगाव केएसपीएल सीझन २ च्या सुपर ८ (क्वार्टर फायनल) मध्ये प्रवेश केला.
🔥 पुढचा सामना – सुपर ८
📆 २४/११/२०२५
⏰ रात्री ८:०० वाजता
⚔️ राजा शिवाजी बेळगाव विरुद्ध बेंगळुरू ग्लॅडिएटर्स.
Belgaum Varta Belgaum Varta