
गावात बैठक घेऊन सर्वानुमते रस्ते करण्याचा निर्धार..
बेळगाव : राजहंसगड गावातील भंगी रस्त्यांची दुरवस्था झाली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यांची कामे रेंगाळली होती याची दखल बेळगांव ग्रामीण भागाच्या आमदार तसेच कर्नाटक राज्य महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे…
या कामाची नुकतीच पाहणी करून मोजमाप करण्यात आले..
याबाबत शनिवारी गावात पंच कमिटीच्या अध्यक्षतेखाली दवंडी देऊन श्री सिद्धेश्वर मंदिरात बैठक घेण्यात आली.
या रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तरी सर्वांनी सहकार्य करावे व तातडीने या रस्त्यांची कामे करून घ्यावीत कुणालाही अडचण असल्यास बैठकीत तक्रार मांडावी असे कळविण्यात आले होते. परंतु कोणीही तक्रार न करता सर्वानुमते रस्ते करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
लवकरच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे…
१) लक्ष्मण नावगेकर यांच्या घरापासून कृष्णा जाधव यांच्या घरापर्यंत
२) श्रीकांत मोरे यांच्या घरापासून भुजंग चव्हाण यांच्या घरापर्यंत
३) बसवंत चव्हाण यांच्या घरापासून किरण मोरे यांच्या घरापर्यंत
४) सतिश पवार यांच्या घरापासून दत्तू रामा मोरे यांच्या घरापर्यंत अशी या भंगी रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत..
हा निधी मंजूर झाल्याने गावातील भंगी रस्त्यांची समस्या सुटणार असून गावकऱ्यांची समस्या मिटणार आहे.. यामुळे गावकऱ्यांतून समाधान व्यक्त असून हेब्बाळकर मॅडमांचे आभार मानले जात आहे.
यावेळी लक्ष्मण थोरवत, शिप्पय्या बुर्लकट्टी, सिद्धाप्पा छत्रे, पी. जी. पवार सर, हणमंत नावगेकर, गुरुदास लोखंडे, सुरेश थोरवत, बसवंत पवार, सिद्धाप्पा पवार, महेश कुंडेकर, विजय मोरे, रामा इंगळे, नारायण नरवाडे, हुवानी बोंगाळे, शंकर लोखंडे, महादेव चव्हाण, सिध्दाप्पा नाईक, मल्लाप्पा नरवाडे, चांगाप्पा चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta