
बेळगाव : बाजार गल्ली वडगाव श्रीसंत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्री अंबाबाई देवस्थानमध्ये दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री अंबाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मीनाक्षी महेंद्रकर, देवेंद्र महेंद्रकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष चंद्रकांत हाशिलकर, मंदिराचे ट्रस्टी उपाध्यक्ष चंद्रकांत महेंद्रकर, मोहन कोपर्डे, संतोष गोंदकर, महादेव भस्मे, दयानंद खटावकर, सतीश खटावकर, विजय भस्मे, रत्नप्पा कोपर्डे, मनोहर नाझरे, मंजू गोंदकर, प्रशांत भस्मे, सतीश पिसे, एम. के. भस्मे व सर्व महिला मंडळ सदस्या, युवक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मोहन कोपर्डे यांनी समाजातर्फे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta