Tuesday , March 3 2026
Breaking News

एम. व्ही. हेरवाडकर स्कुलच्या वतीने एनसीसी डे साजरा

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी येथील एम. व्ही हेरवाडकर स्कुलमध्ये एनसीसी डे हायस्कुलच्या क्रीडांगणावार उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य अरविंद हलगेकर सर, प्राचार्या शोभा कुलकर्णी मॅडम, वरदा फडके मॅडम, एनसीसी ऑफीसर सोनल भातकांडे, शिक्षक, विद्यार्थी इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी इस्कॉटींग व पथसंचलन केले. तसेच पुष्पगुछ देऊन सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाईले. विद्यार्थांनी एनसीसी विषयी माहिती सांगितली व नाटक सादर केले.
यावेळी प्रमुख पाहुणे अरविंद हलगेकर सर, यानी विद्यार्थ्यांना एनसीसीचे तसेच एनडीए या बददल माहिती सांगितले, तसेच आर्मी, एअरफोर्स, नेव्ही इत्यादी वेगवेगळ्या विषयी सविस्तर माहिती सांगीतले व त्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न करावे. या विषयी शिक्षणाच्या दृष्टीकोणातुन आपण वेगवेगळे उदाहरणे देऊन एनसीसीबद्दल महत्व सांगितले
कार्यक्रमाचे स्वागत पर भाषण कुमार आर्य बांदिवडेकर याने केले. पाहुण्यांची ओळख कुमारी श्रावणी जोशीलकर या विद्यार्थीनीने केले. तसेच एनसीसी बद्दल माहिती कुमारी स्वरा पवार या विद्यार्थ्यांनीने सांगितली.
या सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कुमार पृथ्वी गणाचारी या विद्याथ्यांने केले. आभार प्रदर्शनकुमार समर पाटील याने केले. शेवटी एनसीसी गीत व राष्ट्रगीत गाईले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *