

बेळगाव : टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर स्कुलमध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या शोभा कुलकर्णी मॅडम, वरदा फडके मॅडम, एनसीसी अधिकारी सोनल भतकांडे, शिक्षक, विद्यार्थी, इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी एनसीसी कडेटच्या विद्यार्थ्यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, विदयार्थ्यांनी स्वागत गीत, संविधान विषयी शपथ घेतले.
यावेळी कुमारी ओवी पाटिल हिने संविधान बदल माहिती सांगीतले व संविधानमुळे आपल्याला शिक्षणाचे अधिकार, समानतेचे अधिकार, कसे मिळाले या विषयी माहिती सांगितले. तसेच वेगवेगळ्या नाटकाव्दारे संविधानाचे महत्व सांगितले.
यावेळी संविधान विषय शपथ कुमारी चिन्मयी भांदुर्गे या विद्यार्थीनीने केले. तसेच भारतीय संविधान विषयी माहिती सांगितले. सुत्रसंचलन कुमारी शानवी होनुले, आभार प्रदर्शन अभिषेक पाटील याने केले. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थीत होते.
Belgaum Varta Belgaum Varta